बाजारभाव

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती ही
जिल्हयाची बाजार समिती असुन या बाजार समितीची स्थापना स्व.बळीरामजी पाटील रा. पंचाळा यांनी सन. १८९९ साली केली तसेच
मुहुताचे नारळ हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा हस्ते फोडण्यात आले आणि तेव्हा पासुन त्यांनी सांगीतल्या प्रमाणे
मुहूतांचे शेतमाल धारक कास्तकारांचा शाल श्रीफळ देवून मालाचे राशीची पुजा केली जाते. मग नंतर त्या शेतमालाची हर्राशी
केली जाते हा नाविण्यपुर्ण उपक्रम आजही जोपासला जातो. तसेच बाजार समितीच्या कायद्यातील कलम १३ नुसार करण्यात आलेली
असून कृषी पत संस्था व बहुउद्देशीय सहकारी संस्था यांच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्याने निवडुण दिलेले एकुण ११
सदस्य व त्यामध्ये २ महिलाचा सामावेश असतो.
वाशिम कृषि उत्पन्न बाजार समिती स्थापना दि.१०/०७/१८९९ नुसार हैद्राबाद रिसिडेन्सी अॅक्ट प्रमाणे झाली आहे. व सदयाचे
कामकाज महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी विक्री (नियमन) अधिनियम १९६३ व त्याखालील नियम १९६७ प्रमाणे सुरू आहे. वाशिम
कृषि उत्पन्न बाजार समितीस १०० वर्ष पुर्ण झालेली असुन बाजार समितीचा शताब्दी महोत्सव सन १९९९ -२००० मध्ये झालेला
आहे.
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र वाशिम तालुक्या पुरते मर्यादीत असुन सदर कार्यक्षेत्रात एकुण १३०
खेडयाचा सामावेश आहे. वाशिम बाजार समितीनी अनसिंग येथे उपबाजार आवाराची स्थापना १९७१ मध्ये केलेली असुन सदर
उपबाजारास २५ खेडयाचा शेतमाल विक्रीसाठी येतो. तसेच बाजार समितीनी राजगांव येथे उपबाजार दिनाक ०४/०२/२००७ रोजी
स्थापना झाली आहे.
वाशिम मुख्य यार्ड करीता ११ हेक्टर ८६ आर आहे. तसेच राजगांव येथे नविन बाजार स्थापना करीता ५ हेक्टर जमीन खेरदी
केलेली आहे मागीत आमसभेमध्ये पार्डीटकमोर येथे उपबाजार चालु करणे बाबत काही कास्तकारांनी प्रश्न मांडला होता. त्या
बाबत बाजार समितीने पाठपुरवठा करून पार्डीटकमोर येथील जागेचे पैसे भरणा केलेले आहे व लवकरच उपबाजार चालु करण्यात
येईल.
अधिक माहिती साठी क्लिक करा